बातम्या प्रसारित करणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या पत्रकार-अँकर्सना धमक्या

129

 

मुंबई, दि.७ (पीसीबी) – गेले महिनाभर संपूर्ण जगासह भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात पुर्णपणे लॉक डाऊन असून सुद्धा निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजेरी लावल्याने यंत्रणेविषयी शंका निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यापैकी शेकडो नागरिकांना हलगर्जी व नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचे संक्रमनामुळे बाधा झाली आहे.

दरम्यान याबाबत बातम्या प्रसारित करणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या पत्रकार-अँकर्सना धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (News Broadcasters Association NBA)ने समाजातील काही विशिष्ट वर्गातील लोकांकडून न्यूज चॅनेलमध्ये काम करणारे पत्रकार आणि अँकर यांना होणारी शिवीगाळ आणि मिळणाऱ्या धमक्या याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने अलीकडे कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामध्ये तबलिगी जमातची भूमिका उघडकीस आणली. या घटनेनंतरच देशामध्ये पॉझिटिव्ह केस आणि मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यानंतर अँकर आणि रिपोर्टर्सबाबतचा हा ट्रेंड प्रामुख्याने समोर आला आहे.

प्रामुख्याने सोशल मध्यम जसे कि टिकटॉक, ट्विटर, व्हाट्सऍप यांवरून न्यूज चॅनेल मध्ये काम करणाऱ्या ऐंकर, रिपोर्टर यांना लक्ष्य केले जात आहे.सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात काही धर्मोपदेशक टीव्ही न्यूज अँकरचे नाव घेऊन टीका करत आहेत तर ठराविक चॅनेलच्या रिपोर्टरवर हल्ल्याची धमकी देत आहेत. एनबीएकडून या संपूर्ण प्रकाराची निंदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना अशा असामाजिक घटकांवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

लोकशाहीच्या स्थंभांपैकी एक असलेल्या मीडियाला जर अशा अश्लील भाषेत धमक्या येत असतील तर नक्कीच हे योग्य नसून त्यांना देखील धोका निर्माण झाल्याचे वातावरण निर्माण होत आहे.

WhatsAppShare