बांधकाम मजुरांनी नोंदणी करून शासनाच्या २८ योजनाचा लाभ घ्यावा- कामगार आयुक्त

99

इमारत व इतर बांधकाम मजुरांसाठी शासनाने विशेष नोंदणी अभियान सुरू राहणार आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व बांधकाम मजुरांनी विषेश अभियानात सर्वांनी १० एप्रिल पर्यन्त नोंदणी करून सरकारच्या वतीने मिळणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांनी केले.

कष्टकरी कामगार पंचायत आणि घरकाम महिलासभेच्या वतीने पिंपरी येथील भक्ती शक्ती सभागृहात नोंदणी कृत बांधकाम मजुरांना ओळ्खपत्र वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी  घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, सरकारी कामगार अधिकारी एम. जे. मुजावर कामगार निरिक्षक डी. बी. कोळी, मुख्य लिपिक ज्योती पाटील, कष्टकरी कामगार पंचायत संघटक गौतम सरवदे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब वाघ म्हणाले, बांधकाम साईट वर अपघातात मुत्य झाल्यास, त्यांच्या वारसदारांस पाच लाख रुपये आणि पत्नीला पाच वर्षे पंचवीस हजार रुपये मिळतील.  अपघातात गंभीर जखमी झाल्यास दोन लाख रुपये, मुलाच्या शिक्षणासाठी वार्षिक दहा हजार रुपये , अवजार खरेदी साठी पाच हजार रुपये, घर बांधणीसाठी दोन लाख रुपये अशा प्रकारे २८ योजनाचा लाभ बांधकाम मजुरांना मिळणार आहे. या साठी त्याची नोंदणी आवश्यक आहे, नोंदणी केल्याशिवाय हे लाभ मिळणार नाहीत.