बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप

389

ढाका, दि. १० (पीसीबी) – बांगलादेशात २००४ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्लाप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक यांच्यासह इतर १८ जणांना ढाक्याच्या विशेष न्यायालयाने आज (बुधवार) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या झिया यांना मोठा झटका बसला आहे.

२४ ऑगस्ट २०१४ रोजी अवामी लीगने काढलेल्या शांतता रॅलीवर दहशतवाद्यांनी १३ ग्रेनेड फेकले होते. यामध्ये अवामी लीगचे २४ नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी ठार झाले होते. मृतांमध्ये दिवंगत राष्ट्रपती झिल्लूर रेहमान यांच्या पत्नीचाही समावेश होता. तर इतर ५०० जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांपैकी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ उपाध्यक्ष रेहमान यांचाही समावेश असून ते सध्या लंडनमधील एक्साईल येथे वास्तव्यास आहेत. तर माजी गृहराज्यमंत्री लुत्फोजमन बाबर यांचाही शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे.