बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने सात लाख 13 हजारांची फसवणूक

0
189

देहूरोड, दि. ११ (पीसीबी) – बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज काढून देतो, असे आश्वासन देऊन बँकेतून कर्ज काढले. त्या पैशांची कार घेतली. याबाबत संबंधित व्यक्तीने विचारणा केली असता त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 1 नोव्हेंबर 2021 ते 10 मे 2022 या कालावधीत तळवडे येथे घडला.

अतुल सोमेश्वर लोखंडे (वय 32, रा. तळवडे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल उत्तम चौधरी (वय 38, रा. पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याने फिर्यादी अतुल यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी बँक लोन काढून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. बँकेतून सात लाख 13 हजार रुपयांचे अनिल याने अतुल यांच्या नावावर कर्ज काढले. त्यातून फिर्यादी यांच्या नावावर एक कार घेतली. कार शोरूम मध्ये फिर्यादी अतुल यांच्या नावाच्या खोट्या सह्या केल्या. शोरूममध्ये डिलिव्हरीसाठी अनिल याने स्वतःचा नंबर दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अतुल यांनी आबा विचारला असता अनिल याने अतुल यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.