बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेची फसवणूक 

125

पिंपरी, दि.26 (पीसीबी) : सैराट चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत घडली. याप्रकरणी अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिवदर्शन चव्हाण (वय २५, रा. चिंचवड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी शिवदर्शन चव्हाण याने अभिनेता आकाश ठोसर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यानंतर अहमदनगर येथील एका महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संबंधित महिलेकडून सोन्याचे एकाच मंगळसूत्र व हातातील अंगठी असे जवळपास १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने परत करण्याच्या बोलीवर घेतले. हा आरोपी संबंधित महिलेकडून दागिने घेण्यासाठी नगरला आला होता. तेव्हा त्याने मला आकाश ठोसर याने पाठवले असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दागिने परत न केल्याने संबंधित महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत अहमदनगर सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

WhatsAppShare