बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची १ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांना अटक

120

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – बनावट कागदपत्रे तयार करून स्टेट बँक ऑफ हैद्राबादकडून १ कोटी ८ लाख रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापिका शृंखला जैन यांनी फिर्याद दिली होती.