बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

69

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – घर खरेदी व्यवहारात खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच घर मालकाच्या परस्पर घर विकले. यामध्ये मूळ घर मालक आणि खरेदी करणारी व्यक्ती अशा दोघांची फसवणूक झाली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट 2016 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत भूमकर चौक, वाकड येथे घडली.

सागर सॅम्युअल परमार (वय 45, रा. सांगवी), गौरव देविदास अत्तरदे (वय 39, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सागर याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पंकज विलास रणदिवे (वय 43, रा. भूमकर चौक, वाकड. मूळ रा. रायगड) यांनी रविवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या घरासमोर राहणारे अजय रामप्रसाद यांची पूर्व नियोजित कट कारस्थान रचून त्यांची घर खरेदी व्यवहारामध्ये खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. फिर्यादी यांनी घेतलेल्या फ्लॅटची त्यांना विक्री करण्यापूर्वीच तो फ्लॅट सागर परमार याला विकला. याची फिर्यादी यांना कल्पना न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare