बटमालूत सुरक्षा रक्षकांची दहशतवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद

30

जम्मू, दि. १२ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या बटमालू भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर इतर तीन जवान जखमी झाले आहेत. आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास ही चकमक सुरु झाली. ती अद्यापही सुरुच असल्याचे समजते. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. येथे ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळते.