बंद घरातून तीन मोबईल फोन आणि रोकड चोरीला

3

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – बंद दरवाजा उघडून दोन चोरट्यांनी घरातून तीन मोबईल फोन आणि दीड हजार रुपये चोरून नेले. ही घटना 12 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता चक्रपाणी वसाहत येथे घडली. याबाबत 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्लामुद्दीन गुलाबुद्दीन अन्सारी (वय 25, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरीनिमित्त भोसरी येथे वास्तव्यासाठी आले आहेत. त्यांना परिसराची माहिती नाही. ते चक्रपाणी वसाहत भोसरी येथे शहबान अन्सारी यांच्या खोलीत भाड्याने राहतात. 12 सप्टेंबर रोजी फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत खोलीच्या दरवाजाला आतून कडी लाऊन झोपले असताना पहाटे तीनच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी दरवाजाची कडी कशानेतरी उघडून आत प्रवेश केला. खोलीतून सात हजारांचे तीन मोबईल फोन आणि दीड हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. 25 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांनी हा प्रकार त्यांच्या घर मालकाला सांगितला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare