बंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या

326

बंगळुरु, दि. २३ (पीसीबी) –  येथील एका भाजप कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शुक्रवारी (दि.२२) रात्री गोवरी कलुवे भागात दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा चाकूने भोसकून खून केला. 

मोहम्मद अन्वर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. बंगळुरुच्या चिकमंगलोरचे जनरल सेक्रेटरी पद त्यांना देण्यात आले होते.

मोहम्मद अन्वर यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांच्यावर तीनवेळा वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर अन्वर ऱक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या अधिक तपास करत आहेत.