बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

82

पुणे, दि. २६ (पीसीबी) – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) निर्णय होणार आहे.

विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सोमवारी मराठे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकार आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.