बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर

19

पुणे, दि. २७ (पीसीबी) – बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयाने निर्णय दिला आहे. या अटकेवरून महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उडाला असून ही अटकच बेकायदेशीर असल्याचेही आरोप झाले आहेत.

त्यामुळे या जामीन अर्जाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मराठे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून आरबीआय अॅक्टमधील कलम ५८ ई नुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाला अटक करण्यापूर्वी परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसेच झाले नाही.

तसेच अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांना ठेवीदारांकडून पैसे गोळा केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक करणे या कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई योग्य नाही, असे मराठे यांच्यावतीने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते.