बँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण

112

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – बँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे महिलेकडे पैसे मागितले असता महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली व तिच्या आईला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.

राहुल दत्तात्रय इळवे (वय 30, रा.पवनानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे मागितले. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपी सोमवारी रात्री महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. महिलेला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेचा गळा दाबून हाताने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी महिलेची आई आली असता आरोपीने आईला देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ‘तू जर माझ्या विरोधात पोलिसात तक्रार केली. तर मी तुला मारून टाकील व माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल’ अशी आरोपीने धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare