फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करण्यासाठी बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

912

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – फ्रेंडशिप डेचे सेलीब्रेशन करू असे सांगून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा मित्रांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना रविवारी (दि.५) डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी पोलिसांनी मच्छीच्या व्यवसायात असलेल्या २२ वर्षीय तरुणासह एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. दोघांवरही सामूहिक बलात्काराबरोरच अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार केल्याचा (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी तरुणांनी पिडीत अल्पवयीन मुलीला फ्रेंडशिप डे आहे म्हणून फिरायला जाऊ असे सांगितले. ते ओळखीचे असल्यामुळे ती त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाली. त्या दोघांनी तिला मोटरसायकल वरून एका वर्दळ नसलेल्या ठिकाणच्या खोलीत नेले. तिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच घटनेबाबत कुणाला काही सांगीतल्या वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आणि तिला तिच्या घराजवळ सोडले. परंतु त्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत दोघा आरोपींना अटक केली आहे. डोंबिवली पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर व्ही.एम. पवार तपास करत आहेत.