फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्सच्यावतीने ‘निर्मिती २०२०’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न

121

पिंपरी-चिंचवड,दि.२५(पीसीबी) – रास्ता पेठमधील ज्ञानोदय प्रशिक्षण सेवाभावी संस्था संचालित फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्सच्यावतीने निर्मिती २०२० आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या . यामध्ये वाद विवाद , वक्तृत्त्व , पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन , पोस्टर पेंटिंग , फोटोग्राफी , मॅनॅजमेण्ट गेम्स या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानोदय प्रशिक्षण सेवाभावी संस्थेच्या संचालिका निशा मेहता यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी प्रा. डॉ . एम डी लॉरेन्स , प्रा रवी पिल्ले , प्रा अर्चना म्हस्के , शिल्पा खाडे , प्रणाली पारवे , उमेश बेल्लूर व जयप्रकाश प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते .

या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये बी एम सी सी , मॉडर्न , नारळकर , पुना , एच व्ही देसाई , सिम्बायोसिस , डी वाय पाटील , डी एस एच एम सी आदी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . या स्पर्धेमध्ये सी ए ए गुड फॉर इंडिया या विषयांवर वाद विवाद स्पर्धा झाली . यामध्ये एच व्ही देसाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला . तर द्वितीय क्रमांकावर फोरसाइटचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केला . पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनमध्ये यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन , लिडिंग मॉल्स ऑफ पुणे हे विषय होते . यामध्ये बी एम सी सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला . तर द्वितीय क्रमांकावर डी वाय पाटीलचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केला .तर फोटोग्राफी व पोस्टर पेंटिंगमध्ये सामाजिक संदेश व इ कॉमर्स हे विषय होते . यामध्ये पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला . तर द्वितीय क्रमांकावर फोरसाइटचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केला तर मॅनॅजमेण्ट गेम्समध्ये डी वाय पाटीलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला .तर द्वितीय क्रमांकावर फोरसाइटचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केला . या स्पर्धेचे निरीक्षक म्हणूंन मराठवाडा मित्र मंडळाचे प्रा गौरी जाधव , प्रा निधी सातवळेकर ,सेंट व्हिन्सेंटच्या प्रा लिनेट लोबो , श्वेता बाफना , अमरीन मेमन आदींनी काम पाहिले .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत प्रा. डॉ. एम डी लॉरेन्स यांनी तर प्रास्तविक प्रा रवी पिल्ले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा , ज्युलिएट जेव्हीयर तर आभार अमिशा शाह यांनी मानले .