फॉर्च्युनर कार विकण्याच्या बहाण्याने 14 लाख 20 हजारांची फसवणूक

10

वाकड, दि. २२ (पीसीबी) – फॉर्च्युनर कार एका व्यक्तीला विकण्याचा सौदा करून त्यापोटी व्यक्तीकडून 14 लाख 20 हजार रुपये घेऊन कार दुस-याच व्यक्तीला विकली. याबाबत कार विक्री करणा-यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथील मोरया कार्स या दुकानात घडली.

रवींद्र काशिनाथ काकडे (वय 49, रा. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास देवकर (रा. संतोष नगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास देवकर याचे वाकड येथे मोरया कार्स नावाचे कारचे दुकान आहे. आरोपीने फिर्यादी काकडे यांना फॉर्च्युनर कार (एम एच 14 / इ क्यू 0303) विकण्याचा सौदा केला. त्यापोटी आरोपीने काकडे यांच्याकडून 14 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने फॉर्च्युनर कार परस्पर दुस-या व्यक्तीला विकली.

फसवणूक झाल्याने काकडे आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींने काकडे यांना शिवीगाळ करून त्यांच्या मुलाचे आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare