फेसबुक, इन्स्टाग्राम मोबाईलमधून काढा, सुरक्षेच्या कारणास्तव जवनांना निर्देश

18

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – चीनसोबत वाढता तणाव तसं गोपनीय माहितीच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे. सर्वांनी आपल्या मोबोईलमधून ही ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

WhatsAppShare