फुरसुंगीमध्ये कार कालव्यात कोसळून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

602

पुणे, दि. १२ (पीसीबी) – भरधाव वेगाने जाणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना फुरसुंगी येथे आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडली.

नितीन निवृत्ती कुंभार (वय ४३, स.रा. भेकराईनगर, मू.रा. सासवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कराटे प्रशिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर रोडवरील हडपसरच्या दिशेने येताना मधूबन कार्यालयाच्या बाजूने भेकराईनगरकडे नितीन कुंभार आपल्या सॅन्ट्रो कारमधून जात होते. दरम्यान, फुरसुंगी येथील सोनार पुलाचा कठडा तोडून त्यांची कार कॅनॉलमध्ये कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुंभार हे लोणी काळभोर येथील एका शाळेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून काम करत होते.