फुटबॉल सामन्यादरम्यान अभिनेता रणबीर कपूरला दुखापत

266

पुणे, दि.५ (पीसीबी) – पुण्यात एका फुटबॉल सामनादरम्यान अभिनेता रणबीर कपूरच्या पायाला दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात रणबीरसोबतच अभिषेक बच्चन, शब्बीर आहलुवालिया, करण वाही, अरमान जैन, आदर जैन, इशान खट्टर, जिम सर्भ यांसारखे बऱ्याच सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.

रणबीरच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी तो एका शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाला.

रणबीरला फुटबॉल खेळणे फार आवडते हे अनेकांनाच ठाऊक आहे. अनेकदा अभिषेक बच्चनसोबत त्याला सराव करताना पाहिले गेले आहे. या दोघांनी मिळूनच फुटबॉलच्या प्रदर्शनीय सामन्यासाठी सेलिब्रिटींची टीम तयार केली. पुण्यात हा सामना खेळला गेला आणि त्यामध्ये अभिषेकच्या टीमने बाजी मारली.