फुटबॉलचा विश्वकरंडक चार नव्हे आता ‘एवढ्या’ वर्षांनी

28

पॅरिस, दि.२० (पीसीबी) : फुटबॉलची शिखर संघटना असलेल्या फिफासमोर फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा ४ नव्हे दोन वर्षांनी घेण्यात यावी असा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावाविषयी राष्ट्रीय फुटबॉल संघटनांची मते जाणून घेण्यासाठी फिफाने ३० सप्टेंबर रोजी ऑन लाईन बैठकीचे आयोजन केले आहे.

आंतरराष्ट्रीय कार्यक्रम निश्चित करण्यासाठी या निर्णयावर विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात येणार आहे. यासाठी सर्व महासंघ आणि भागधारकांनाही आपली मते मांडण्यास सांगण्यात आले आहे.

अर्सेनेलचे माजी व्यवस्थापक अर्सेनी वेंजर यांनी या दोन वर्षांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा प्रस्ताव मांडला होता. या कल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय, युरोपियन आणि कोपा अमेरिका सारख्या स्पर्धा दरवर्षी घेण्याचा विचार असेल.

युईएफएचे अध्यक्ष अॅलेक्झांडर सेफरिन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्याचबरोबर युरोपियन देश दोन वर्षांनी विश्वकरंडक खेळण्यावर बहिष्कार टाकतील असा इशाराही त्यांनी त्या वेळी दिला. दक्षिण अमेरिकन संयुक्त महासंघाने देखील या प्रस्तावात खास काही आहे असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. दोन वर्षांच्या विश्वकरंडक स्पर्धेला चाहत्यांकडून मात्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. फिफाने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणानंतर हे समोर आले आहे. त्यामुळे फिफाचे अध्यक्ष गिआनी इन्फॅंन्टिनो हे प्रस्तावाच्या बाजूने असून, या वर्षा अखेरपर्यंत यावर निर्णय होईल असे त्यांनी म्हटले आहे.

WhatsAppShare