फुगेवाडी जकात नाक्यावर वाहनांना आडवून लुटणारी टोळी जेरबंद

156

भोसरी, दि. १५ (पीसीबी) –  फुगेवाडी जकात नाक्यावर मोटार वाहने आडवून हत्यारांचा धाक दाखून लुटमार करणाऱ्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.१३) करण्यात आली.

योगेश उल्हास गायकवाड (वय २८), रोहित अशोक गायकवाड (वय २२, दोघेही रा. गायकवाड चाळ, फुगेवाडी) आणि अमोल रामचंद्र गायकवाड (वय ३२, रा. मोरया पार्क, सूर्या लेन, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नाव आहेत. याप्रकरणी फिरोज रमझान अत्तार (वय २२, रा. संघर्ष हौसिंग सोसायटी, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास फिर्यादी फिरोज हे खेड शिवापूर येथून मोटारीतून आपल्या घरी जात होते. फुगेवाडी जकात नाका येथे आले असता दुचाकीवरून आलेले  योगेश, रोहित आणि अमोल या तिघांनी  त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावक चाकूचा धाक दाखवून फिरोज आणि त्याचा मित्र यश कदम यांच्याजवळील चार हजार ३५० रुपयांची रोकड व इतर मुद्देमाल जबरदस्तीने हिस्कावून चोरु नेला. यावर भोसरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तिघा आरोपींना चाकू आणि मुद्देमालासह अटक केली. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.