फुगेवाडीतील सागर फुगेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

87

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – फुगेवाडी येथील सागर फुगे सोशल फाउंडेशन आणि महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने सागर फुगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना वह्या व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसावर होणारा नाहक खर्च टाळून सागर फुगे यांनी विद्यार्थ्यांना मदत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, माई काट, प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, संजय कणसे, माजी नगरसेवक विजय लांडे, उषा वाखारे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत वाखारे, वैशाली वाखारे, मनोज वाखारे, प्रवीण गायकवाड, रुपेश फुगे, तुषार फुगे, दीपक पवार आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका आशा शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.