‘फिर एक बार शिवशाही सरकार’; मुख्यमंत्री फडणवीस काढणार रथयात्रा

92

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.  भाजपने राज्यातील २८८ पैकी २२० जागा जिंकण्याचे  लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.  जनतेपर्यंत भाजप सरकारची विकासकामे पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रत्येक मतदारसंघात रथ यात्रा काढणार आहेत.

‘फिर एक बार शिवशाही सरकार’ अशी देवेंद्र फडणवीस यांच्या रथयात्रेची टॅगलाईन असणार आहे. भाजप सरकारने  केलेल्या कामांचा आढावा या रथयात्रेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस देणार आहेत. या रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघात पोहोचण्याचे उद्दीष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांचे असणार आहे. प्रत्येक दिवशी सहा मतदार संघांमध्ये मुख्यमंत्री  दौरा करणार आहेत,  अशी माहिती मिळत आहे.

रथयात्रा सरकारची असल्यामुळे शिवसेनेचे मंत्री देखील या रथयात्रेत सहभागी होऊ शकतात, असे  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी देखील अशी रथयात्रा काढली होती. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी अशाच प्रकारची रथयात्र काढली होती.