फारुख अब्दुल्लांच्या वसाहतीमध्ये बॅरिकेट तोडून कार घुसवली

85

श्रीनगर, दि. ४ (पीसीबी) –  जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला राहत असलेल्या बठिंडी परिसरातील  वसाहतीमध्ये एका व्यक्तीने बॅरिकेट तोडून कार घुसवली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी चालकावर गोळीबार केला.  

सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात कार चालकाला गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर त्याला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बठिंडी भागात फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे इतरही मोठे नेते राहतात. या भागात   कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेवेळी फारुख अब्दुल्ला घरात नव्हते. फारुख अब्दुल्ला यांचे घर वसाहतीच्या उजव्या बाजूला आहे. या घटनेला सध्या दहशतवादी घटनेशी जोडता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. ही एक घटना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची सखोल  चौकशी करण्यास सुरूवात झाली आहे.