फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल..

107

हिंजवडी, दि. १६ (पीसीबी) – बांधकामाच्या विकसन करारनाम्यात संबंधित जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता फसवणूक केली. तसेच 10 कोटी 85 लाख रुपये अथवा पाच हजार चौरस फुट वाढीव बांधकाम करून देण्याची खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2021 रोजी परसीस्टंट कंपनीच्या बाजूला असलेल्या ज्यूस सेंटरवर हिंजवडी फेज एक येथे घडली.

चंदू लक्ष्मणदास रामनानी (रा. पिंपरी), किरण चंदू रामनानी (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन किरणदास सोनिगरा (वय 35, रा. चिंचवड स्टेशन) यांनी रविवारी (दि. 15) हिंजवडी पोलिसांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीगसी टॉवर असोसिएट ही नंतर रुपांतर झालेली लीगसी टावर्स असोसिएट एलएलपी यांच्यातर्फे रावेत येथील सर्वे नं 106 मधील 15 गुंठे क्षेत्रात बांधकाम केले जात आहे. चंदू आणि किरण यांनी आपसात संगान्मात्कारून संबंधित जागा महार वतनाची आहे, याचा उल्लेख न करता जाणूनबुजून फिर्यादीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लपवून ठेऊन फिर्यादी यांचे 18 लाख रुपयांचे नुकसान केले.

विकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी नाही दिली तर पोलिसात तक्रार करण्याची तसेच बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.