फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

148

रांची, दि.१२ (पीसीबी) – अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.  त्यामुळे आमिषाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

२०१८  मध्ये चित्रपट निर्माते अजय कुमार यांनी   ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी  अमिषाला तीन कोटी रुपये  अॅडव्हान्स  म्हणून दिले होते.  मात्र, काहीही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ होऊ शकला नाही. त्यामुळे अजयकुमार यांनी अमिषाकडे  पैसे परत देण्यास सांगितले. मात्र, तिने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

अजयकुमार यांनी तगादा लावल्यानंतर अखेर अमिषाने  अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला. त्यामुळे चेक बाउंस प्रकरणी अमिषाविरुद्ध अजयकुमार यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर  रांची न्यायालयात पैशांची फसवणूक केल्याचा खटला आमिषाविरोधात  दाखल करण्यात आला.

त्यानंतर अमिषा हिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने एकदाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर न्यायालयाने तिला अनेक वेळा समन्स पाठवले. आता तिच्याविरोधात अटक वॅारंट काढण्यात आले आहे. त्यामुळे अमिषा चांगलीच अडचणीत आली आहे.

WhatsAppShare