फलटण येथील पालखी तळावर दोघा भाविकांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू

31

फलटण, दि. १६ (पीसीबी) – फलटण येथील पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्‍का लागल्याने त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास घडली.

ज्ञानोबा माधवराव चोपडे (वय ६५, रा. समतापूर, ता. जि. परभणी) आणि जाईबाई महादू जामके (वय ६० रा. शिवणी, पो.सुनेगाव, ता.लोहा, जि. नांदेड) अशी ठार झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. तर कमलाबाई गोविंद लोखंडे (वय ६५, रा.सासफळ, ता.पूर्णा, जि. परभणी) असे जखमी वारकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीअनुसार, फलटण पालखी तळावरील पालापासून विद्युत वाहक तार गेली होती. आज (सोमवार) पहाटे  चारच्या सुमारास तीन वारकऱ्यांना ही तार न दिसल्याने त्यांना या विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यात ज्ञानोबा चोपडे आणि जाईबाई जामके यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कमलाबाई लोखंडे या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.