प्रो-बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगला सलग अकरावे जेतेपद

159

नेवार्क, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवून पराभव पत्कारावा लागल्यानंतर पुन्हा बॉक्सिंगच्या मैदानात उतरलेल्या बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. वर्षभर रिंगपासून लांब राहिलेल्या विजेंदरने आज पहाटे अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करत बॉक्सिंग करियरमधील ११ वा विजय संपादन केला आहे. त्याचबरोबर प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत विजेंदर आणि स्नायडर दरम्यान अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. ८ राऊंडच्या मिडलवेट कॉन्टेस्टमध्ये विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट केलं. विजेंदरने प्रो-बॉक्सिंग करियरमध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यातील ८ सामन्यात तर त्याने नॉकआऊटद्वारे विजय मिळविला आहे.

या सामन्यानंतर त्याने सर्वांचं आभार मानत या लढतीचा व्हिडिओही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘गान अर्पित, प्राण अर्पित, रक्‍त का कण-कण समर्पित। चाहता हूं देश की धरती, तुझे कुछ और भी दूं।,’ विजयानंतर त्याने अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.