प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियसीवर धारदार चाकूने वार

174

पुणे, दि.१२ (पीसीबी) – प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. चंदननगर येथे ही घटना घडली असून किरण शिंदे (वय २५) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे हा हिंजवडीतील आयटी कंपनीत कामाला होता. नोकरी करत असतानाच तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतही होता. किरण हा काळेवाडी येथे राहतो. याच परिसरात पूर्वी मीना पटले (वय २३) ही तरुणी रहायची. यादरम्यान किरणची तिच्याशी ओळख झाली. मीना ही मूळची गोंदिया येथील रहिवासी होती. ती पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तसेच एका कॉल सेंटरमध्येही काम करत होती. तिचे वर्षभरापासून किरणसोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी ती चंदननगर येथे रहायला गेली होती. मीनाचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय किरणला होता. मंगळवारी रात्री किरणने मीनाला भेटायला बोलावले. यानंतर त्याने मीनावर चाकूने वार केले. या घटनेनंतर किरण पसार झाला आहे. या हल्ल्यात गंभीर झालेल्या मीनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता