”प्रेमासाठी कायपण” ! २ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर प्रियकर गायब, तरूणीचं ‘सासरी’ ठिय्या आंदोलन.. 

102

लोहरिया दि. १४ (पीसीबी) – प्रेमात लोक नको नको ते करतात. अशीच एक लव्हस्टोरी उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील लोहरियाव गावातील आहे. इथे एक तरूणी लग्न करण्याची जिद्द करत आपल्या बॉयफ्रेन्डच्या घरी पोहोचली आणि ठिय्या आंदोलन करू लागली. आता तरूणी म्हणाली की, जोपर्यंत तिचा प्रियकर तिच्यासोबत लग्न करत नाही, तोपर्यंत ती तेथून उठणार नाही.

लोहरियाव गावात राहणाऱ्या पंकज मौर्यच्या घरी बुधवारी सायंकाळी सुमन यादव पोहोचली. यानंतर तिने काही न बघता तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि पंकजसोबत लग्नाची मागणी करू लागली. सुमनचा आरोप आहे की, ती जौनपूर नगरमध्ये कपड्यांचा स्टॉल लावते. ती म्हणाली की, २ वर्षांपासून पंकज आणि ती पती-पत्नीसारखे राहत आहेत. त्यावेळी पंकज लग्न करण्यासाठीही तयार होता. पण अचानक पंकजने फोन बंद केला आणि तो फरार झाला. आता तो दीड महिन्यांपासून फरार आहे. सुमन म्हणाली की, त्याच्या परिवाराने त्याच्यावर या नात्यातून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकला होता.

सुमन म्हणाली की, याबाबत तिने जौनपूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. इतकंच नाही आता ती न्याय मिळवण्यासाठी प्रियकराच्या घरी जाऊन ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसली आहे.

सुमनने गंभीर आरोप लावत हेही सांगितलं की, पंकजकडे दीड लाख रूपये कॅश, १.३५ लाख रूपयांचे दागिने आणि सुमनच्या कमाईचे पैसे होते. इतकंच नाही तर सुमनने पंकजवर जबरदस्ती अबॉर्शनचा आरोपही लावला आहे. ती म्हणाली की, तक्रार केल्यावरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यानंतर ती तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली.

सुमन ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसल्याने तिला बघण्यासाठी लोकांनी पंकजच्या घरासमोर गर्दी केली. गावभरात तिचीच चर्चा सुरू आहे. आता सुमन न्याय मिळण्याची वाट बघत आहे. सध्या ती २४ तासांपासून आपल्या ‘सासरी’ ठिय्या आंदोलनावर बसली आहे. पोलिसांनी तिला न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.

WhatsAppShare