प्रेमविवाह केल्याने विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल..

51

लोहगाव, दि. १७ (पीसीबी) – तरुणीने प्रेमविवाह केला या कारणावरून तिच्या सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना फेब्रुवारी 2020 ते 3 मार्च 2021 या कालावधीत तुळजापूर आणि लोहगाव, पुणे येथे घडली.

 

सचिन गणपतराव गायकवाड (वय 25), सासू (वय 45), सासरे गणपतराव गायकवाड (वय 50) महिला आरोपी (वय 24, सर्व रा. एसटी कॉलनी, तुळजापूर, ता. जि. उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने रविवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेने आरोपी पती सचिन याच्यासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर सासरच्या लोकांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच घरातील कामे येत नाहीत व कौटुंबिक कारणाने फिर्यादी यांना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली. याबाबत विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी एच शिखरे तपास करीत आहेत.