प्रिय निर्भया… काळीज पिळवटून टाकणारे शालिनी ठाकरे यांचे पत्र

139

मुंबई, दि.१० (पीसीबी) – वर्धा जिल्ह्यातील दारोडा गावासाठी सोमवारची सकाळ भूकंपाच्या धक्क्यासारखी ठरली. दारोडा गावची प्राध्यापक लेक हिंगणघाट येथे महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला जिवंत जाळले. आगीने होरपळलेल्या पीडितेचा  सोमवारी उगवत्या सूर्याबरोबरच श्वास तुटला. काही क्षणात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि संतापाची लाट उसळली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. सर्वसामान्य जनतेतून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही या घटनेवर काळजाला हात घालणार आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार पत्र लिहिले आहे.

प्रिय निर्भया,कुणी तरी तुझ्यावर ऍसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं…

Gepostet von Shalini Thackeray am Montag, 10. Februar 2020