प्रिया प्रकाश नावाचे वादळ पुन्हा इंटरनेटवर

946

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळं ‘नॅशनल क्रश’ ठरलेली प्रिया वारियार पुन्हा एकदा इंटरनेट ढवळून काढलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे साडीतले काही खास फोटो शेअर केले आहेत. तिचा हा नवा लूक पाहून चाहते घायाळ झाले असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

प्रियाचा हा देसी लूक तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पडताच काही मिनिटांतच त्यांना हजारो लाइक्स मिळाले आहेत. हजारो लोकांनी ते शेअरही केले आहेत. ‘ओरू अदार लव्ह’ या मल्याळी सिनेमातून प्रियाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच सिनेमातील एका व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आता ती काय नवे घेऊन येते, याबाबत उत्सुकता आहे.