प्रियकराने लग्नास नकार दिला म्हणून तिने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

64

चाकण, दि. 25 (पीसीबी) : प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून प्रेयसीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील प्रियकरावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आकाश युवराज भोकसे ( रा. कुरकुंडी, ता. खेड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. सबंधित पिडीत तरुणीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आकाश आणि फिर्यादीची एकोणीस वर्षीय मुलगी यांच्यात नोव्हेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत प्रेमसंबंध होते. तरुणी ही वारंवार आकाश याच्याकडे लग्नाचा तगादा लावू लागल्याने आकाशने लग्न करण्यास नकार दिला. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तीचे जीवन जगणे असह्य केले. यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे चाकण पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

WhatsAppShare