प्रा. डॉ. हरिष तिवारी यांना ‘इनोव्हेटिव लिडर नॅशनल ॲवार्ड २०१८’ पुरस्कार

117

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे (पीसीसीओईआर) प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांना  ‘इनोव्हेटिव लिडर नॅशनल ॲवार्ड २०१८’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अनेक प्रशिक्षण व संशोधन पुरक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मागील दोन वर्षात शंभराहून जास्त पेटंटची नोंदणी करण्यात आली. तसेच महाविद्यालयात एकाच दिवशी दीडशेहून जास्त ‘कॉपी राईट’ ची नोंदणी करुन राष्ट्रीय विक्रम करण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन केंद्रा (इस्त्रो) च्या वतीने महाविद्यालयात मानवी जीवन अधिक सुखी व्हावे, यासाठी अनेक संगणक प्रणाली उपग्रहामार्फत विकसित करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यामधील अनेक संगणक प्रणालीचा वापर मुंबई, नवी मुंबई मध्ये पाणीपुरवठा, वाहतूक समस्या आणि मेट्रो शहरात, स्मार्ट सिटी प्रकल्पांत करण्यात येत आहे. याचीच नोंद घेऊन दिल्लीमधील ‘लाईफ स्टार ग्लोबल वेलफेअर फाऊंडेशनच्या ’वतीने ‘इनोव्हेटिक लिडर नॅशनल ॲवार्ड २०१८’ पुरस्कार देऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य लतिफ मगदूम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.