प्रसिध्द पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्यास अटक

61

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

राजेश कुमार शुक्ला (वय ३०, रा. बिहार, सासाराम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलक मुच्छलचा चाहता असल्याने आरोपी राजेश हा पलक हिला भेटायला बिहारहून मुंबईला आला. यावेळी त्याने पलकने आपली भेट घ्यावी, म्हणून तिचा पाठलाग करणे, नजर ठेवणे आणि फोनवरुन धमकी देणे, असे सर्व प्रकार केले. सुरुवातीला तिने राजेशच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केले, मात्र हे प्रकार वाढल्यामुळे तिने आंबोली पोलिसात धाव घेतली. बुधवारी (दि.६) पोलिसांनी राजेश याला अटक केली. त्याची चौकशी केली असता तो प्राध्यापक असल्याचे समोर आले. टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा नंबर शोधल्याचा दावा राजेशने केला. पलकला मेसेज केल्यानंतर दोन-तीन वेळा त्याने तिला भेटण्यासाठी फोनही केला होता. आपल्याला न भेटल्यास विनयभंग करण्याची धमकीही त्याने दिली होती.

आशिकी २, मिकी व्हायरस, आर… राजकुमार, जय हो, किक, बाहुबली, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटात पलकने गाणी गायली आहेत.