प्रसिध्द नृत्यांगणा सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

237

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – हरियाणातील प्रसिध्द  नृत्यांगणा सपना चौधरी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली.त्यामुळे सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना सुरूवात झाली आहे.  

यावेळी सपना यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या तरी मी राजकारणात प्रवेश करण्याचा विचार केलेला नाही. मात्र, भविष्यात मी काँग्रेसचा प्रचार करू शकते आणि राजकारणातही प्रवेश करू शकते. राजकारणाविषयी माहिती करून घेण्यासाठी मी  काँग्रेस मुख्यालयात आल्याचे सपना यांनी सांगितले.

सोनियाजी, प्रियांका आणि राहुल हे तिघेही मला खूप आवडतात. मला काँग्रेसचे आकर्षण असून  या  नेत्यांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती. मागील अनेक वर्षापासून काँग्रेसने देश सांभाळला आहे.   माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी काँग्रेसला मत द्यावे, असे काही नाही. माझ्या आवडीचा पक्ष वेगळा आणि माझी कला वेगळी आहे. एक कलाकार म्हणून सर्वच पक्षाचे लोकांचे माझ्यावर प्रेम असून माझ्या कलेला दाद देतात, असे सपना म्हणाल्या.