प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने बांधली प्रियकर फरहान शेखसोबत लग्नगाठ; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल

136

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. फरहान शेखसोबत शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. शाल्मलीने गायलेल्या दारू देसी, परेशान , बालम पिचकारी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच ‘सूर नवा ध्यास नवा’ आणि ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ या शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका पार पडाली. लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शाल्मलीने विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ’22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.’

शाल्मलीचने लग्नासंदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

WhatsAppShare