प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी मिळेल ते वाचा- मिर्लेकर 

165

आकुर्डी, दि. ११ (पीसीबी) – प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास बाळगा, जे मिळेल ते वाचा यश नक्की मिळेल. असा सल्ला शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर दिला. 

शिवसेना आणि युवासेना भोसरी विधानसभा तर्फे आयोजित केलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएएस ॲकॅडमीच्या पिंपरी चिंचवड शाखेचे उदघाटन आकुर्डी येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आयएएस हेमंत पाटील, शिवसेना उपनेते तथा ॲकॅडमीचे संस्थापक विजय कदम, जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, महिला आघाडीच्या वैशाली सूर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर, पालिकेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव, वेदश्री काळे, कामगार नेते इरफान सय्यद, रोमी संधू, बाजीराव लांडे, सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी, विश्वनाथ टिमगिरे, विशाल यादव, युवराज कोकाटे, वैशाली मराठे, वैभवी घोडके, युवासेना जिल्हा अधिकारी सुरज लांडगे आदी उपस्थित होते.

मिर्लेकर पुढे म्हणाले कि, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पन्नास वर्षापूर्वी पहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. या ॲकॅडमीमुळे तरुणांच्या पंखांना बळ मिळणार आहे. शिवसेना आजही शेतकरी, भूमिपुत्र, कामगार यांच्यासाठी लढत आहे. शिवसेना राजकारण कमी तर समाजकारण जास्त करते. म्हणूनच ॲकॅडमीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा वसा शिवसेनेने घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी सुरज लांडगे, जिल्हा समन्वयक रूपेश कदम, सचिन सानप, कुणाल जगनाडे, अमित शिंदे, दत्तात्रय यादव, किशोर शिंदे, संदेश मुळे, हरिष कुदळे, मकरंद कदम, रूषिकेष जगदाळे, पिंपरी विधानसभा युवती अधिकारी प्रतिक्षा घुले, निलेश हाके यांनी विशेष परिश्रम घेतले