प्रशांत किशोर यांचा सर्व्हे; राहुल गांधीपेक्षा मोदींनाच नागरिकांची पहिली पसंती

64

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महात्मा गांधी यांच्या १८ सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतील, असा विश्वास देशातील ४८ टक्के नागरिकांनी व्यक्त केल्याचे एका पाहणी अहवालातून समोर आले आहे.  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप आघाडीवर आहेत.