प्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे

0
755

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज (शनिवार) झालेल्या निवडणुकीत विष्णू सदाशिव कोकजे यांनी बाजी मारली. कोकजे १३१ मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण २७३ प्रतिनिधींपैकी १९२ प्रतिनिधींनी मतदान केले. यामुळे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे.

विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.