प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

187

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – चिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिखली, कुदळवाडी येथील प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतल हगवणे, धर्मा तंतरपाळे, किशोर लोंढे आदी उपस्थित होते.

देहूरोड महिला अध्यक्षा ज्योती वैरागर, शंकर वैरागर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.