प्रभाग क्र ८ इंद्रायनीनगर, बालाजीनगरात रस्त्याचे कामे वेगात – जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांनी जागेवर जाऊन केली पाहणी

13

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – कोरोनामुळे थांबलेली विकास कामे आता वेगात सुरू झाली आहेत. प्रभाग क्रमांक ८ इंद्रायनीनगर, बालाजीनगर मध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची स्थानिक जेष्ठ नगरसेविका सौ. सिमाताई सावळे यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधीत अधिकारी उपस्थित होते. कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पेठ क्र ३ तिरुपती चौक तुलसी हाइट समोरील रस्ता ते पेठ क्र १ ला नाशिक हाईवेला जोड़नारा १२ मीटर डीपी रस्ताचे काम वेगात सुरू आहे. कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता म्हणून हे काम रखडले होते. आता कोरोनाचा प्रभाव एकदम कमी झाला असल्यामूळे वार्डामधे विकास कामे मोठ्या प्रमानात सूरू केली आहेत, असे सौ. सावळे यांनी सांगितले. रोज़च वेग-वेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर जावुन तिथे आपण पाहणी करत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात विस्कळीत झालेले अनेक विकास कामे किंवा दुरुस्ती कामे आता एक – एक करून मार्गी लावत आहे. नागरिकांचेही त्यासाठी मोलाचे सहकार्य आहे, अशी माहिती सौ. सिमाताई सावळे यांनी दिली.

WhatsAppShare