प्रदुषणामुळे मानवाचे आयुर्मान कमी होत नाही ! – प्रकाश जावडेकर

131

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – भाजप नेते आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत बोलताना प्रदुषणामुळे मानवाचे आयुर्मान कमी होत नाही, असा दावा केला आहे. भारताच्या संशोधनात प्रदूषणामुळे एखाद्याचे आयुष्य कमी झाले असा एकही दाखला आयप तरी समोर आलेला नाही, असे जावडेकर म्हणाले.

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयुष्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

WhatsAppShare