प्रथमच पिंपरीचिंचवड महापालिकेचं आयुक्त पद भूषविणार महिला अधिकारी…?

826

पिंपरी, दि.२६(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान संवेदनशील आयुक्त श्रावण हर्डीकर ह्यांच्या सेवेचा कार्यकाळ संपल्यामुळे नवे आयुक्त कोण येणार ह्या बाबत जोरदार चर्चा सुरू आहे,अर्थातच महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने येणारे आयुक्त आपल्या मर्जीतले असावेत यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावून सध्या विदर्भ आणि कोकणात कार्यरत असलेल्या 2 अधिकाऱ्यांची नावं सुचविल्याची खास माहिती सूत्रांनी दिलीये.

मात्र, राज्याच्या राजकारणाची सूत्र महाआघाडीच्या हातात गेल्या नंतर मुद्दाम पुण्याचं पालकमंत्री पद स्वीकारणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालकेच्या नव्या आयुक्तांची स्वतः निवड करण्याचं ठरवून येथील सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरविण्याची तयारी केल्याची जोरदार चर्चा आहे.
त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेचा प्रगल्भ अनुभव असणाऱ्या रुबल अगरवाल ह्यांना प्राधान्य दिल्याची माहिती समजतीय

कोण आहेत रुबल अग्रवाल-

-मूळच्या राजस्थानच्या रहिवासी
– 2008 बॅचला IAS पास आऊट
– अकोला उपजिल्हाधिकारी,जळगाव जिल्हाधिकारी, शिर्डी संस्थान CEO, मुंबई, मराठवाडा विभागात प्रशासकीय कामाचा प्रगल्भ अनुभव
– सध्या पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या अध्यक्षपदी
-पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्याची मुख्य जबाबदारी

ओळख-
उच्चशिक्षित असलेल्या रुबल ह्यांनी “बेटी बचाव बेटी पढावं” अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे शासनाकडून गौरव, जळगावमध्ये आलेल्या अस्मानी संकटात महत्वपूर्ण कामगिरी, शिर्डी संस्थानवर CEO पदी असतांना आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यावर अधिक भर देऊन केली 500 रुग्णवाहिका 3-Tesla मशीन्सची उपलब्धी तर सध्या पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सक्षमपणे हातळत असल्याने प्रशासनावर मजबूत पकड
अर्थातच अधिकारी म्हणून रुबल कार्यरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय कामगीरी केल्याने निर्णयक्षम अधिकारी म्हणून ख्याती

रुबल ह्यांच्यावर भ्रष्टयाचाराचा एकही आरोप नाहीये शिवाय त्यांचा अनुभव अभ्यास, आणि त्यांच्याकडून अडचणींवर मात करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनाच्या प्रेझेंटेशनने प्रभावी होऊन त्यांना आयुक्तपदी आणण्यासाठी अजित दादा आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

WhatsAppShare