प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करणारा राज ठाकरेंचा पक्ष संपलाय – अबू आझमी

195

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपला  आहे. ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, ज्या प्रकारे लोक असरानी , मेहमूद सारख्या कलाकारांना ऐकायचे तसेच राज ठाकरे हे मिमिक्री आर्टीस्ट आहेत, त्यामुळे लोक त्यांनाही ऐकतात, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे.

आझमी म्हणाले की, राज ठाकरे यांच्यामुळे परप्रांतीयांवर हल्ले झाले  आहेत. त्यांना मारहाण करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे निवडणुकीत विसरले आहेत. राज यांना सोबत घेतल्याने काँग्रेस आघाडीला फायदा नसून नुकसानच होणार आहे.

भाजपच्या पापाचा घडा भरला आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ५० टक्के नुकसान होईल, असा दावाही आझमी यांनी केला आहे. राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस आणि महागठबंधनला राज्याच्या बाहेर नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.