प्रतिस्पर्ध्याची जात काढून जातीय विद्वेष पसरवण्याचे शरद पवारांचे राजकारण जुने – माधव भांडारी

24

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – गेल्या दोन-तीन वर्षांपासून सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मनातील जातीय विद्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत:च महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण करत आहेत. तसेच समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आपल्याच राजकारणाचे वर्णन करताना पवार भाजपचे  नांव घेत आहेत,  असे चोख प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शरद पवारांना दिले आहे.