प्रणव मुखर्जींनंतर आता रतन टाटा संघाच्या मंचावर जाणार

32

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर दिसतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले आहे. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावर गेल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता.
‘नाना पालकर स्मृती समितीने २४ ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात रतन टाटा आणि मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. ही समिती टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रूग्णांना मदत करते,’ अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.
‘नाना पालकर स्मृती समिती करत असलेल्या कामाबद्दल रतन टाटा यांना माहिती आहे,’ असेही संघाचा पदाधिकारी म्हणाला.
‘रतन टाटा जर या कार्यक्रमाला जाणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे,’ असे म्हणत टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमाबद्दल बोलण्यास नकार दिला. ‘आमच्या समितीचे संस्थापक नाना पालकर यांचे शताब्दी वर्ष आहे, तसेच आमच्या संघटनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे.