प्रचारसभेला आलेल्या राहुल गांधींच्या मार्गावर सिलेंडर स्फोट  

157

यवतमाळ, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी  प्रचारसभा झाल्यानंतर हेलीकॉप्टरकडे गेले असताना त्याच मार्गावर  सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. ही घटना वणीतील एकता नगरमध्ये रस्त्यालगतच्या दुकानात  घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी झुणका भाकर केंद्र चालविले जाते. गॅस सिलेंडर बदलला जात असतानाच अचानक गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट झाला. आगीच्या ज्वालांनी दुकानाला कवेत घेतले. दरम्यान राहुल गांधींच्या वाहनांचा ताफा याच मार्गावरून गेल्याने त्याठिकाणी पोलिसांसह सर्व बंदोबस्त तैनात होता.

त्यामुळे लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनातून पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. आगीत दुकान खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाने वणीत खळबळ उडाली आहे.

WhatsAppShare