प्रगती फाउंडेशनच्या वतीने हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन

114

पुणे, १६ (पीसीबी) – बेरोजगार स्त्रिया आणि तरुणांना मदत करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असलेल्या प्रगती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे विविध अपसाऊथ आउटलेटस मध्ये महिलांनी हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

यामध्ये कानातील, गळ्यातील हार, तोरण, किचेन्स, बाहुल्या आणि पिशव्या यांचा समावेश आहे.  पुण्याच्या झोपडपट्टीतील स्त्रियांनी बनविलेली ही उत्पादने असून रेस्टॉरंटच्या वाकड, औंध आणि विमान नगर येथील शाखांमध्ये १८ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

यावेळी बिलियन स्माईल्स हॉस्पीटॅलिटी प्रा.ली.चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले,  एक प्रस्थापित हॉस्पीटॅलिटी ब्रँड म्हणून कार्यरत असताना शाश्वत विकास आणि समाजाचे पाठबळ या गोष्टी हातात हात घालून चालतात याची जाणीव आम्हांला आहे. झोपडपट्टीतील महिलांना रोजगार मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रगती फाउंडेशनच्या कार्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही काम करत आहोत.